शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 17:46 IST2021-02-04T17:44:16+5:302021-02-04T17:46:20+5:30

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने ह्यविकेल ते पिकेलह्ण आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

Launch of Vegetable Center from Farmer to Consumer Direct | शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला केंद्राचा शुभारंभ

जुनी शेमळी येथे शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला केंद्राच्या शुभारंभप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, जनार्दन शेलार, लालचंद सोनवणे, कैलास बच्छाव आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देशेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने ह्यविकेल ते पिकेलह्ण आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने जनार्दन शेलार यांच्या हस्ते भुसे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन, साखरचंद बच्छाव, कैलास बच्छाव, दिलीप वाघ, लोटनदा शेलार, दादा बागुल, सागर बच्छाव, भास्कर बच्छाव नाना मल्ले, सचिन वाघ, दादा वाघ, मनीष शेलार, आदेश पाटील, हेमंत बागुल, सोमनाथ बच्छाव, तालुका कृषी अधिकारी एस. एस. पवार, कृषी सहाय्यक योगिता कापडणीस, ज्ञानेश्वर शेलार, बबलू बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Web Title: Launch of Vegetable Center from Farmer to Consumer Direct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.