वाघेरा येथे विविध कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:12 IST2020-01-10T22:57:10+5:302020-01-11T01:12:08+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते वाघेरा ते हरसूल रस्त्याला जोडणारा पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. राजविहीर पाडा, कोशिम पाडा, कसबेपाडा याठिकाणी नवीन अंगणवाडी व गोधड्याचा पाडा येथे भूमिगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले.

वाघेरा येथे विविध कामांचा शुभारंभ
वाघेरा येथे भूमिपूजन करताना आमदार हिरामण खोसकर, संपत सकाळे, मोतीराम दिवे, विनायक माळेकर आदी.
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते वाघेरा ते हरसूल रस्त्याला जोडणारा पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. राजविहीर पाडा, कोशिम पाडा, कसबेपाडा याठिकाणी नवीन अंगणवाडी व गोधड्याचा पाडा येथे भूमिगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत सकाळे, पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, भाजपचे युवा नेते इंजिनिअर विनायक माळेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, सरपंच यशोदा खेडूळकर, माजी सरपंच जयराम मोंढे, माजी सरपंच विठ्ठल खेडूळकर, मोहन देशमुख, कचरू देशमुख, कचरू बदादे, ग्रामसेवक महाजन उपस्थित होते.