ओझर येथे टमाटा लिलावाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 18:10 IST2020-08-17T18:09:53+5:302020-08-17T18:10:59+5:30
ओझर : शेवटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पहिल्या बोलीचा भाव १००१ रु पये मिळाला असून पिंपळगावच्या मुख्य बाजार आवारात शुभारंभावेळी हाच भाव ८२१ रुपये मिळाला होता.

ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ करताना सभापती दिलीप बनकर, राजेंद्र शिंदे, निवृत्ती धनवटे, दीपक बोरस्ते, सतीश जाधव, संजय टर्ले आदी.
ओझर : शेवटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पहिल्या बोलीचा भाव १००१ रु पये मिळाला असून पिंपळगावच्या मुख्य बाजार आवारात शुभारंभावेळी हाच भाव ८२१ रुपये मिळाला होता.
यावेळी पहिले शेतकरी संजय टर्ले यांचा सत्कार केला. एकूण सहा व्यापारी सदर लिलाव प्रक्रि येत सहभागी झाले होते. तर भर पावसात देखील टमट्याची ८०० जाळी आवक झाली. मर्चंट बँकेचे संचालक राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक निवृत्ती धनवटे, राजेंद्र शिंदे, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन संदीप अक्कर, योगेश चौधरी, कैलास शिंदे, आवारप्रमुख सतीश जाधव, वासुदेव जाधव, दशरथ पवार, शरद गाडे आदी उपस्थित होते.