शिंदेत अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:37 IST2018-09-29T01:37:19+5:302018-09-29T01:37:37+5:30

मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 Launch of the study room of Shinde | शिंदेत अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण

शिंदेत अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण

नाशिकरोड : मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.  शिंदे गाव परिसरातील विद्यार्र्थ्यांसाठी मायलन कंपनीकडून अभ्यासिका इमारत उभारून देण्यात आली आहे. यापुर्वी देखील मायलन कंपनीकडून शिंदे गावासाठी रूग्णवाहीका भेट देण्यात आली होती. अभ्यासिका लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बाजार समिती संचालक संजय तुंगार, सरपंच माधुरी तुंगार, उपसरपंच नितीन जाधव, मायलन चे स्वदेश सक्सेना, प्रशांत सामनेकर, रवी विश्वनाथ, भगवान जाधव, संजय कपुरे, दुर्गा मल्लिकार्जुन, सतिष जैन, अजय जगताप, सुभाष मोरे, किरण गोजरे, मंगेश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य विठाबाई झाडे, मुक्ता तुंगार, फुलाबाई तुंगार आदी उपस्थित होते.

Web Title:  Launch of the study room of Shinde