मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव परिवहन विभागात ह्यरस्ता सुरक्षाह्ण अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने देवळा बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर तसेच वाहन दिशादर्शक फलक लावण्यात आले. या वेळी मोटार वाहन निरीक्षक नरेंद्र जाधव, अतुल सूर्यवंशी, देवळा बाजार समितीचे उपसभापती रमेश मेतकर, संचालक जगदीश पवार, प्रदीप आहेर, काकाजी शिंदे, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश कोठावदे, कांदा व्यापारी अमोल आहेर, अनिल पगार, सचिव माणिक निकम, डॉ. राजेंद्र गुंजाळ, वाजगावचे उपसरपंच बापू देवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
देवळा परिसरात रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:16 IST