लाखी डिझायनिंगच्या प्रदर्शनास प्रारंभ
By Admin | Updated: May 9, 2014 23:53 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-09T23:53:06+5:30
नाशिक : देशाच्या विविध राज्यांतील स्थानिक चित्रकलेतून विविध वस्तूंची सजावट केलेल्या लाखी डिझायनिंग प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला़

लाखी डिझायनिंगच्या प्रदर्शनास प्रारंभ
नाशिक : देशाच्या विविध राज्यांतील स्थानिक चित्रकलेतून विविध वस्तूंची सजावट केलेल्या लाखी डिझायनिंग प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला़
हार्मनी आर्ट गॅलरी येथे सायंकाळी वास्तुविशारद संजय पाटील व उद्योजिका विनीता धारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले़ यावेळी चित्रकार स्नेहल जोशी, सुहास जोशी आदि उपस्थित होते़
या प्रदर्शनात नाशिकसह झारखंड, राजस्थान, गुजरात यांसह विविध राज्यांतील स्थानिक चित्रकला साकारलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत़ यामध्ये साड्या, ओढणी, घड्याळे, आरशे, कुशन कव्हर्स, फ ाईल, लॅम्प शेड्स यासह होम डेकोरेशनचे विविध साहित्य मांडण्यात आले आहे़ हे प्रदर्शन रविवारपर्यंत रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहे़