शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:51 IST

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला.

ठळक मुद्देनाशिकचे ई-गर्व्हंनन्स केंद्र देशासाठी ठरणार आदर्शमोबाईलद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची ४३ लाख

नाशिक : वकिलांसह पक्षकारांचाही वेळ व श्रम वाचविण्यासाठी ई- ई-कोर्ट प्रभावी ठरणार आहे. नाशिकचे ई-गर्व्हनन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल, याचा मला विश्वास आहे. लॉकडाऊन काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य झाले. व्हर्च्युअल कोर्ट लॉकडाऊनमध्येही सुरू होते. त्यामुळेच महाराष्ट्रसह देशभरात हजारो ते लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला आणि बारच्या पाठिंब्याशिवाय न्यायप्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही, याची मला पुर्ण खात्री आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचुड यांनी केले.

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला. यावेळी उद्घाटक म्हणून चंद्रचुड बोलत होते. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता होते. याप्रसंगी महाराष्ट्रचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे आदिंनी सहभाग घेतला.
यावेळी चंद्रचुड म्हणाले, कोव्हिडने आपल्या सर्वांना खुप काही शिकविले आहे. कोव्हिडमुळे कामाचे स्वरूप जगभरात बदलून गेले. न्यायव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. न्यायव्यवस्थेचे कान, नाक वकिलवर्ग आहे. देशातील पहिले ई-गव्हर्नंस केंद्र संपुर्ण भारतासाठी आदर्श ठरेल, याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.नाशिकला सुरू झालेले ई-गव्हर्नंस सेंटर कोव्हिड-१९च्या संक्रमण काळात नक्कीच गरजेचे होते. लॉकडाऊन काळात न्यायप्रक्रियाही प्रभावित झाली. ई-फायलिंग, व्हिडिओ कॉन्सफरन्सींगद्वारे सुनावणी हे या काळात अधिक लाभदायी ठरले. हे केंद्र नक्कीच यशस्वी होईल, याचा मला विश्वास आहे, असे मत न्यायाधीश दिपंकर दत्ता यांनी यावेळी व्यक्त केले.
आधुनिकतेचा जलद न्यायप्रक्रियेला नक्कीच फायदा होणार आहे. हा न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा आधुनिक बदल असून ती काळाची गरज आहे. या केंद्राचा फायदा महाराष्ट्रसह गोवा राज्यातील १ लाख ७५ हजार वकिलांना होणार असल्याचा विश्वासही अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी व्यक्त केला. ई-कोर्टला खूप पसंती मिळत आहे. मोबाईलद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची ४३ लाख इतकी मोठी आहे. यामध्ये वकिलांसह पक्षकारांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.  प्रास्ताविक नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. आभार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस