शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूरला विभागीय उपकेंद्र ; कुलगुरु डॉ. म्हैसेकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 20:05 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त केली असून आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र, अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी अभ्यासक्रमप्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ प्रतिकुलपतींच्या निर्देशानुसार कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांची वर्धापन दिन कार्यक्रमात माहिती

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे केली. आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र, अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट करीत कुलगुरु डॉ. म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तसेच कार्यालयीन कामासाठीच्या अडचणी विनाविलंब सुटाव्यात तसेच कामकाज अधिक सुलभ व्हावे, यासाठी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथे उपकेंद्र सुरू करण्याची भूमिका मांडली. तसेच आरोग्य क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रमाणावर कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात प्रतिकुलपती देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच सुरू होतील, असेही कुलगुरु डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 

रोजगाराच्या नव्या संधी... प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे आरोग्य क्षेत्रात तांत्रिक व कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्स इन आॅपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, रेडिओ टेक्नॉलॉजी, ईपीडेमिक मॅनेजमेंट, डायलेसीस, ईसीजी, कॅथलॅब याबरोबरच पंचकर्म, आयुर्वेद नर्सिंग, डेंटल मेकॅनिक याचेही प्रमाणपत्र अभ्यासक्रम एक ते दोन वर्षे कालावधीचे राहतील, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यMedicalवैद्यकीयuniversityविद्यापीठ