उशिरा, पण स्वागतार्ह निर्णय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:43+5:302021-09-25T04:14:43+5:30
नाशिक : कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या ...

उशिरा, पण स्वागतार्ह निर्णय !
नाशिक : कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालये दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यात पुन्हा बंद कराव्या लागले. आता दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी झाली असून, लसीकरणाचा वेगदेखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र, शाळा-महाविद्यालये आणि मंदिरे अद्यापही बंदच आहे. त्यातच ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने आणि पालकांनादेखील परवडत नसल्याने शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून विचारला जात होता. त्यामुळे अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. ‘देर आये, दुरुस्त आये’ अशा शब्दात शिक्षण संस्थाचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. घोषणा झाली आता पुढील तयारीसाठी अंमबजावणीचे स्पष्ट आदेश लवकरात लवकर मिळावे, अशी अपेक्षा संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे.
------ संस्थाचालक म्हणतात --------
ऑनलाइन शिक्षणात अनेक समस्या येत असल्याने प्रत्यक्षात शाळा सुरू करणे गरजेचेच होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेला निर्णय
योग्यच आहे. आता पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवावी. शाळांनीही नियमांचे पालन करून जबाबदारी पार पाडायला हवी.
शाळा सुरू करण्यासंदर्भात संस्थेने सर्व तयारी अगोदरच पूर्ण केलेली आहे.
- दिलीप बेलगावकर,
सरकार्यवाह, भोसला
---------
ऑनलाइन शिक्षण आणि घरी बसून विद्यार्थी कंटाळले आहेत. मुलांनी शाळेत जावे, अशी पालकांचीही इच्छा आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने घे
तलेला निर्णय स्वागतार्ह आहे. आता पुढील नियोजन करण्यासाठी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार की ५० टक्के क्षमतेने याबाबतच आदेश
लवकर मिळणे अपेक्षित आहे.
- प्रा. दिलीप फडके,
उपाध्यक्ष, नाएसो
-----
उशिरा घेतला असला तरी स्वागतार्ह निर्णय. आता अंमलबजावणीबाबत स्पष्ट आदेश मिळायला हवेत. मागील वेळी राज्य शासन आणि जिल्हा
प्रशासनाच्या आदेशात विसंगती होती. यावेळी तसे होऊ नये. आदेशात विसंगती असल्याने राज्याचे आदेश ग्राह्य धरून शाळा सुरू करणार आहे.
- सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक
-----
शाळा सुरू करण्याचा विद्यार्थीहिताच्या दृष्टीने योग्य असाच आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु सरकारने आदेश काढताना, त्यात अटी-शर्ती लागू करून कोचिंग क्लासेसलाही परवानगी द्यावी, यासाठी शनिवारी (दि. २५) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.
- जयंत मुळे, अध्यक्ष,
नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना
------ प्रतिक्रिया फोटो : आर ला आहे -------