नवीन पीक येण्यास उशीर ; कांद्याचा तुटवडा कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:27 IST2020-10-21T23:04:34+5:302020-10-22T00:27:08+5:30
नाशिक : राज्यात अद्याप परतीच्या पावसाचा जोर कायम असून त्याचा कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात आहे.

नवीन पीक येण्यास उशीर ; कांद्याचा तुटवडा कायम राहणार
नाशिक : राज्यात अद्याप परतीच्या पावसाचा जोर कायम असून त्याचा कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कांद्याची स्थिती असून, यावर्षी लाल कांद्याची लागवडही उशिरा झाली आहे. काही ठिकाणी झालेली लागवड वाया गेली आहे. अनेक शेतक?्यांच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यावर्षी लाल कांद्याची स्थितीही चांगली नाही. यावर्षी कधी नव्हे ते उन्हाळ कांदा सडण्याचे प्रमाणही अधिक वाढले असल्याने बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. पावसामुळे यावर्षी नुकसान अधिक असल्यामुळे नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर आहे. किमान जानेवारीपर्यंत स्थिती अशीच राहील निसर्गाने साथ दिली नाही तर मार्चपर्यंत तुटवडा जाणवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लागवडीवर परिणाम
यावर्षी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने रब्बी कांदा लागवड घटण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने गतवर्षी एक लाख ३१ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड झाली होती. यावर्षी दीड लाख हेक्टर गृहीत धरण्यात आले असले तरी बियाण्यच्या तुटवड्यामुळे मागील वर्षीपेक्षाही यावर्षी कमी लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी कांद्याचे नुकसान अधिक आहे. नवीन कांदा येण्यास अद्याप उशीर आहे. यामुळे साधारणत मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीची स्थिती आहे. नुकसानीमुळे कांद्याचा अधिक तुटवडा असल्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढणार आहेत. दक्षिण भारतात जर स्थिती चांगली झाली आणि तिकडून कांदा आला तरच स्थितीत थोडीफार सुधारणा होऊ शकते. - विलास शिंदे , अध्यक्ष , सह्याद्री फार्मस?् प्रोड्युसर कं.