गूढ नाट्याला उलगडत नेणारा ‘शेवटचा डाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:55 IST2019-08-24T00:54:57+5:302019-08-24T00:55:14+5:30
प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचण्यात यशस्वी ठरते.

गूढ नाट्याला उलगडत नेणारा ‘शेवटचा डाव’
नाशिक : प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचण्यात यशस्वी ठरते.
हेमंत आगरकर लिखित मोहन जोशी दिग्दर्शित ‘शेवटचा डाव’ हे एक बहुरंगी नाटक साकारले आहे. नाटकाचा प्रारंभ एका रस्ते अपघाताने होतो. मोलकरीण सुनंदा बंगल्यात घेऊन जयशील या एका युवकाला घेऊन येते. बंगल्यात जयशीलची गाठ नाटकाची नायिका वंदनाशी पडते. वंदना ही तिच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीमंत उद्योगपतीची तरु ण बायको आहे. ती स्वच्छंदी, खर्चिक, पण असुरक्षित मन:स्थितीत जगणारी तरु णी आहे. जयशील मात्र होतकरू, बेरोजगार, गरजवंत असतो. वंदना एका विशिष्ट अभिलाषेसाठी जयशीलला जाळ्यात ओढून त्याचा उपयोग करते.
अपर्णा, संतोष, नीलिमा, सूरज, मयूर, कैलाश, पवन सर्वांनी छान भूमिका साकारल्या आहेत. नाटकाच्या कथेला साजेसं नेपथ्य नागसेन
वानखेडे, अनिल कोमटवार, प्रशांत इंगळे यांनी केले. प्रकाशयोजना सुहास वारद आणि अनिल कोमटवार तर संगीत संयोजन डॉ. राजेश तायडे, मंगेश निचत यांनी केले. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा कायम टिकून राहते. दिग्दर्शन मोहन जोशी यांचे होते.