शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

लासलगावी आॅडिटरनेच केला रक्कम लुटल्याचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:08 PM

सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक यानी कर्ज वसुलीची रक्कम बॅँकेत भरणा करण्यास जात असताना दोन अनोळखी इसमांनी बॅगेतून १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा केलेला बनाव सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी उघडे करीत फिर्यादीलाच अटक करून अवघ्या काही तासांत या रकमेपैकी एक लाख दहा हजार रु पये मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून अवघ्या काही तासांत तपास

लासलगाव : सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक यानी कर्ज वसुलीची रक्कम बॅँकेत भरणा करण्यास जात असताना दोन अनोळखी इसमांनी बॅगेतून १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा केलेला बनाव सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी उघडे करीत फिर्यादीलाच अटक करून अवघ्या काही तासांत या रकमेपैकी एक लाख दहा हजार रु पये मुद्देमाल जप्त केला आहे.सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचे आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक (रा. गौळाणे रोड, पाथर्र्डी फाटा, नाशिक यानी लासलगाव पोलीस कार्यालयात सोमवारी (दि.१७) दुपारी तीन वाजता लासलगावच्या एचडीएफसी बॅँकेच्या फायनान्स खात्यात कर्ज वसुलीची रक्कम ३,६६,५१० ही बॅँकेत भरणा करण्यास जात असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरून तोंडाला रु माल बांधून दोन अनोळखी इसमांनी लासलगावच्या दत्त मंदिरासमोर यामाहा एफझेड मोटारसायकलवरून (क्र. एमएच जीई ८२३७) घेऊन जात असता बॅगेतून एक लाख शहाण्णव हजारांची रक्कम लुटल्याची फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी फिर्यादीची चौकशी केली असता हा सर्व प्रकार संशयास्पद दिसून आला. चौकशीनंंतर हा फिर्यादीच चोर निघाला. त्यानंतर सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक (रा. गौळाणे रोड, पाथर्डी फाटा नाशिक) यास अटक केली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी