लासलगावी बसचालकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:30 IST2019-11-28T00:29:08+5:302019-11-28T00:30:20+5:30
लासलगाव : लासलगावजवळील पिंपळगावनजीक येथे पाटोदा शिवारात असलेल्या रस्त्यावर बसचालकास मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लासलगावी बसचालकास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : लासलगावजवळील पिंपळगावनजीक येथे पाटोदा शिवारात असलेल्या रस्त्यावर बसचालकास मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२६) सात वाजेच्या दरम्यान येवल्याकडून पाटोदा मार्गे लासलगावकडे येणारी बस (क्र. एमएच १४, बीटी ०५५६) येत असताना यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राहुल सुरेश
पोटे याने बसचा पाठलाग करून त्याची मोटारसायकल आडवी घातली. यावेळी बसचालक सूर्यभान रामभाऊ नागरे (वय ५४) यांच्यासोबत हुज्जत घातली तसेच चालकास शिवीगाळ करून मारहाण केली.
संशयित पोटे याने चालक सूर्यभान रामभाऊ नागरे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच मारहाण केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात पोटेविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.