मातोरीतील अत्याचाराच्या घटनेचा लासलगावी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:10 IST2020-01-19T23:10:19+5:302020-01-20T00:10:08+5:30
नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले.

मातोरी येथील फार्म हाउसवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करणारे निवेदन पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देताना लासलगाव येथील आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी.
लासलगाव : नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले.
नाशिकजवळील मातोरी येथे एका फार्म हाउसवर रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवण्यास नकार देण्याच्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने डीजे चालकास मारहाण केली होती. या घटनेचा लासलगावमधील सर्व सामाजिक -राजकीय संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली. महिला मंडळाच्या वतीनेही पोलिसांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महिला मंडळाच्या तुळसा शेजवळ, निर्मला शेजवळ, भारती शेजवळ, शैला अहिरे, मनीषा शेजवळ, सविता शेजवळ, अविता शेजवळ, विमल शेजवळ, रमण शेजवळ, सुशीला शेजवळ, माया केदारे तसेच रिपाइंचे शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, भारिप बहुजन महासंघाचे सोनू शेजवळ, विलास खैरनार, सागर आहिरे, नितीन शेजवळ, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष प्रकाश संसारे आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.