लासलगावी कांद्याला ४५८१ रूपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 13:33 IST2019-10-31T13:33:12+5:302019-10-31T13:33:24+5:30
लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी झाली.

लासलगावी कांद्याला ४५८१ रूपये भाव
लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी झाली. त्यामुळे कांद्याला ४५८१ रूपये हा सर्वात जास्त भाव जाहीर झाला. लासलगांव बाजार समितीत दिनांक ३१ आॅक्टोबर रोजी कांदा आवक केवळ ६९ वाहनातुन ७१५ क्विंटल इतकी झाली. बाजारभाव रु पये प्रति क्विंटल किमान २००० ते कमाल ४५८१ व सरासरी ४१०० रूपये होते. येथील बाजार समितीत दिपावली सणांच्या सुट्टीनंतर बुधवारी दि.३० आॅक्टोबर रोजी कांदा आवक कमी झाल्याने भावात १५० रूपयांची तेजी होऊन ४६ वाहनातील ५०७ क्विंटल कांदा किमान १३०१ ते कमाल ४०५२ व सरासरी ३७०० रूपये क्विंटल भावाने सकाळी सत्रात विक्र ी झाला. दिनांक २३ रोजी कांदा आवक २९६९ क्विंटल २९० नग वाहनातुन झाली. प्रति क्विंटल उन्हाळ कांदा किमान १२०० ते ३७६१ रूपये सर्वात जास्त तर सरासरी ३५०० रूपये झाली.