वाढत्या उन्हामुळे लासलगावकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 19:38 IST2019-03-30T19:38:10+5:302019-03-30T19:38:37+5:30
लासलगाव : येथील जनतेला उन्हाळ्याच्या वाढत्या तपमानामुळे गरम हवेच्या उकाड्यात हैराण व्हावे लागले.

वाढत्या उन्हामुळे लासलगावकर हैराण
ठळक मुद्देटरबुज खरेदीवर विशेष कल होता.
लासलगाव : येथील जनतेला उन्हाळ्याच्या वाढत्या तपमानामुळे गरम हवेच्या उकाड्यात हैराण व्हावे लागले. शनिवार असल्याने रस्त्यावर दुचाकी मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या. दुचाकीस्वार या रणरणत्या उन्हापासून बचाव करण्याकरीता ऊपरणे टोप्या, डोक्यावर घेऊन प्रवास करताना दिसू लागले आहेत. बाजारात सकाळी दहा वाजताच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. शरीराला गारवा मिळावा करीता ऊसाचा रस तसेच थंडगार ज्युस व लस्सीला मागणी वाढली. तसेच ताक, मठ्ठा विक्र ीत वाढ झाली असून ऊस रसवंती केंद्रावर तुफान गर्दी होती. शिवाय टरबुज खरेदीवर विशेष कल होता.