लासलगावला सायंकाळी ७ वाजेनंतरही दुकाने खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:46 IST2021-03-11T21:52:36+5:302021-03-12T00:46:23+5:30
लासलगाव : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापनांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची वेळ दिली असताना लासलगाव मधील व्यावसायिकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.

लासलगावला सायंकाळी ७ वाजेनंतरही दुकाने खुली
लासलगाव : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापनांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची वेळ दिली असताना लासलगाव मधील व्यावसायिकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
निफाड तालुक्यातसह लासलगाव मध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दुकानदारांसाठी विशिष्ट वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र व्यावसायिक आणि नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात ग्रामपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन याबाबत दुसऱ्या दिवशीही कुठलीही कारवाई करताना आढळून न आल्याने प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.