लासलगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:14 IST2020-07-26T21:27:31+5:302020-07-27T00:14:36+5:30

लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले.

Lasalgaon Peace Committee meeting | लासलगावी शांतता समितीची बैठक

लासलगावी शांतता समितीची बैठक

ठळक मुद्देसर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन

लासलगाव : बकरी ईद एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय अधीक्षक माधव रेड्डी यांनी केले.
येथे पोलीस प्रशासनामार्फत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, उपसरपंच जयदत्त होळकर, हारुण शेख, नुरानी मशीदचे मौलाना मंजूर अहमद मिल्ली यांनी नियम पाळून नमाज घरीच पठण करून बकरी ईद साजरी करावी, असे सांगितले. बैठकीस पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, गुणवंत होळकर, प्रकाश पाटील, राजू राणा यांच्यासह येथील मशिदीचे मौलाना, ट्रस्टी उपस्थित होते.

Web Title: Lasalgaon Peace Committee meeting