लासलगांवी कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:14 IST2020-01-01T13:14:44+5:302020-01-01T13:14:52+5:30
लासलगांव : येथील बाजार समितीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत सातशे रूपयांची घसरण होत सकाळी ११४८ वाहनातुन कांदा आवक झाली.

लासलगांवी कांदा दरात घसरण
लासलगांव : येथील बाजार समितीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत सातशे रूपयांची घसरण होत सकाळी ११४८ वाहनातुन कांदा आवक झाली. लाल कांदा किमान १५०० ते कमाल ४५५१ व सरासरी ३७०० रूपये भाव जाहीर झाला. सरासरी भावात देखील सातशे रूपयांची घसरण झालेली आहे. बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८,६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला. महाराष्ट्रातील सर्वच कांदा बाजारपेठेत लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने व कांदा उत्पादक पुरेसा तयार परिपक्व कांदा लिलावास आणित नसल्याने मागील सप्ताहाच्या तुलनेत कमाल भावात घसरण होत आहे. सोमवारी सर्वाधिक भाव ५७६१ रूपये जाहीर झाला. १९०४ वाहनातील २०,७८६ क्विंटल लाल कांदा १५०० ते कमाल ५७६१ तर सरासरी ४५०१ रूपये भावाने झाला.गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ७१,९४२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये २,००० कमाल रु पये ८,३०१ तर सर्वसाधारण
रु पये ६,७०१ प्रती क्विंटल राहीले होते.