चार रुग्ण आढळल्याने लासलगावी लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 16:10 IST2020-07-12T16:09:44+5:302020-07-12T16:10:06+5:30
लासलगाव : येथील कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे ग्रामपंचायतीसह विविध व्यावसायिक संघटनेचे बंदचा निर्णय घेतल्याने रविवारी लासलगावी शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात आले.

चार रुग्ण आढळल्याने लासलगावी लॉकडाऊन
रविवारी लासलगाव येथे नव्याने दोन पुरूष, दोन महिला तर मरळगोई खुर्द येथे एक महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी सांगितले. रविवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्यासह पोलिस यंत्रणा बंदवर लक्ष ठेवुन होती. लासलगाव बाजार समितीत कोरोना रूग्णामुळे शेतीमालाचे लिलाव बंद असून ते सोमवारी (दि. १३) सुरू होणार असल्याचे सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.