लासलगाव ग्रामपंचायत निवडणूक १७ जागांसाठी ७२ इच्छुकांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:16 IST2020-12-30T21:36:48+5:302020-12-31T00:16:28+5:30
लासलगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत लासलगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यामध्ये आता दिग्गजांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे दिसत आहे.

लासलगाव ग्रामपंचायत निवडणूक १७ जागांसाठी ७२ इच्छुकांचे अर्ज
ठळक मुद्देदिग्गजांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक चुरशीची
लासलगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत लासलगाव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ७२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यामध्ये आता दिग्गजांनी उमेदवारी केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे दिसत आहे.
बुधवारी (दि.३०) ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली, त्यामुळे लासलगाव येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर समर्थक निफाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात उपस्थित होते.
लासलगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महेश नागपुरे निवडणूक निर्णय अधिकारी, तर तलाठी नितीन केदार त्यांना सहाय्य करीत आहेत.