लासलगावी सराफ व्यावसायिक ांचा बंद

By Admin | Updated: March 16, 2016 22:22 IST2016-03-16T22:14:39+5:302016-03-16T22:22:23+5:30

लासलगावी सराफ व्यावसायिक ांचा बंद

Lasalgaawi Sarafa professional shut down | लासलगावी सराफ व्यावसायिक ांचा बंद

लासलगावी सराफ व्यावसायिक ांचा बंद

 लासलगाव : अर्थसंकल्पात शासनाने सोने खरेदीवर एक टक्का केंद्रीय उत्पादन शुल्क आकारणी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ लासलगाव सुवर्ण असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये शहरातील सर्वच सराफ व्यावसायिकांनी सहभागी होत गुरुवारपासून कडकडीत बंद पाळला आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात या बंदमुळे नागरिकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे. बंदमुळे लाखोची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य फेडरेशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
भारत सुवर्ण कारागिरीकरिता जगात प्रसिद्ध आहे. भारतात या कारागिरांची संख्या कोटीच्या वर आहे. तसेच व्हॅट, आयकर, कस्टम ड्यूटी, एलबीटी, सोने खरेदीवर लावण्यात आलेला कर रद्द करावा, अशा अनेक मागण्यांच्या विरोधात राज्यातील सर्वच संघटना एकवटल्या असून, त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यात सराफ व कारागीर सहभागी झाले आहेत. लासलगाव सराफ असोसिएशनने या आंदोलनात
सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मागण्यांचे निवेदन लासलगावचे मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर यांना दिले आले.
ऐन लग्नसराईची धामधूम सुरू असताना सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमुळे वधू-वर पक्षातील नातेवाइकांना नाहक वैताग सहन करावा लागत आहे.
लासलगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष दिंडोरकर, मुरलीधर वर्मा, सुरेश वडनेरे, दत्ता घोडके, किशोर वडनेरे, राधेश्याम वर्मा, संजय दाभाडे, राजेश वर्मा, किरण विसपुते, मनोज मंडलिक, आनंद वर्मा, शैलेश वाघ, शिवाजी विसपुते, सागर वाघ आदि व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Lasalgaawi Sarafa professional shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.