हृदयरोग असलेल्यांची भारतात सर्वाधिक संख्या
By Admin | Updated: November 23, 2014 00:25 IST2014-11-23T00:24:47+5:302014-11-23T00:25:23+5:30
हृदयरोग असलेल्यांची भारतात सर्वाधिक संख्या

हृदयरोग असलेल्यांची भारतात सर्वाधिक संख्या
नाशिक : जगाच्या तुलनेत हृदयरोग असलेल्यांची भारतात सर्वाधिक संख्या असून, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माधवबागचे डॉ़ उन्मेश पनवलेकर यांनी केली़ लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच, श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड व माधवबाग आयुर्वेद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘सुदृढ हृदय’ या विषयावर ते बोलत होते़ पनवलेकर पुढे म्हणाले की, हृदयरोग देशात झपाट्याने वाढत चालला आहे़ जगभरात २३ टक्के, तर भारतात मात्र ५२ टक्के हृदयरोगाचे प्रमाण आहे़ तसेच हृदयरोगामुळे मृत्यूचा दरही वाढलेला आहे़ हृदयरोगावर मात करण्यासाठी सर्वांनी आपल्या जीवनपद्धतीत बदल तसेच नियमित व्यायामाची आवश्यकता असल्याचेही पनवलेकर यांनी सांगितले़ शरणपूर रोडवरील श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँकेत झालेल्या व्याख्यानमालेत लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष रमेश देशमुख, शरद बुरकुले, मधुकर सोनवणे यांच्यासह विविध ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष व सदस्यांनी हृदयरोगाबाबत माहिती जाणून घेतली़ यावेळी बँकेच्या विविध शाखांचे शाखाधिकारी सर्वोत्तम कुलकर्णी, दिनेश कामत, शशांक शुक्ला, माधवबागच्या डॉ. आनंदी साठे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़(प्रतिनिधी)