मनमाड महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 17:07 IST2021-02-04T17:04:42+5:302021-02-04T17:07:35+5:30
मनमाड : येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मराठी विभागाचे विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

मनमाड महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा
मनमाड : येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मराठी विभागाचे विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
या पंधरवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मराठी विभागातर्फे निबंध, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागातर्फे कवी प्रदीप गुजराथी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कवी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून वाचन व भाषेचे महत्त्व विशद करून हे आपल्याला हसत खेळत जीवन जगायला शिकवतात. यावेळी स्नेहा शेजवळ,तृप्ती मोरे, जयेश सूर्यवंशी, रुपाली कुलकर्णी व पल्लवी सोनवणे यांनी अनुक्रमे वादविवाद, वक्तृत्व, पोवाडा व कविता वाचनाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. ज्योती पालवे होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. पवनसिंग परदेशी यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून दिले. यावेळी डॉ. व्हि. टी थोरात, प्रा. एन. ए.पाटील, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.वर्षाराणी पेडेकर, प्रा. ठाकोर, प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घुगे व आभार प्रदर्शन प्रा. कातकडे यांनी केले.
(०४ मनमाड)
मनमाड महाविद्यालयात व्याख्यान देताना कवी प्रदीप गुजराथी. प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित उपप्राचार्य प्रा. ज्योती पालवे प्रा. डॉ. पवनसिंग परदेशी आदी.