शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भुजबळ कुटुंबीयांना भूखंड जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 05:02 IST

महाराष्ट्र सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये गजाआड असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली.

नाशिक : महाराष्ट्र सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये गजाआड असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली. यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.शिलापूर शिवारात असलेल्या या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने ही जप्तीची नोटीस बजावली आहे. आर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे समीर तसेच पंकज भुजबळ आणि सत्येन आप्पा केसरकर हे संचालक आहेत. भुजबळ यांच्या मालकीच्या चिपाड तसेच अन्य साहित्यापासून वीजनिर्मिती करणारी कंपनी सुरू झाली आणि नंतर बंदही पडली. या कंपनीसाठी कर्ज काढताना नाशिक मर्चंट बॅँकेकडे जमीन गहाण ठेवण्यात आली होती. तालुक्यातील सर्व्हे नंबर ७९५/३पैकी २३ आणि ६ हे गट नंबर शेफाली भुजबळ तर ४ व ५ हे गट विशाखा भुजबळ यांच्या नावावर आहेत. या पाचही बिनशेती मिळकतीचे एकूण क्षेत्र ४ हजार २५० चौरस मीटर असून आॅफिसचे क्षेत्र ६००.४७ चौरसमीटर इतके आहे.>प्रतीकात्मक ताबाथकबाकी भरण्यासाठी नाशिक मर्चंट बँकेने १ एप्रिल २०१७पासून कर्ज परतफेड करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे ९ एप्रिल रोजी कलम १३(४) नियम ९ अन्वये प्रतीकात्मक ताबा घेतला आहे.१ एप्रिल २०१७पासून थकीत रकमेसह परतफेड करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.