साधुग्रामसाठी भूसंपादन कुंभमेळ्यापूर्वी अशक्यच

By Admin | Updated: August 31, 2014 00:55 IST2014-08-29T00:41:24+5:302014-08-31T00:55:14+5:30

सिंहस्थ कुंभमेळा : तात्पुरत्या अधिग्रहणाची तयारी सुरू

Land acquisition for Sadhugram is impossible before Kumbh Mela | साधुग्रामसाठी भूसंपादन कुंभमेळ्यापूर्वी अशक्यच

साधुग्रामसाठी भूसंपादन कुंभमेळ्यापूर्वी अशक्यच

नाशिक - कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांच्या तसेच त्यांच्या खालशांच्या संख्येत वाढ होणार हे गृहीत धरून महापालिकेने तपोवन परिसरात ३२३ एकर क्षेत्राचे भूसंपादन करावे असा निर्णय घेतला. अर्थात त्यासाठी राज्य शासनाने मोबदला अदा करावा असा दावा केला असून, राज्य शासनाने मात्र ही जबाबदारी झटकली आहे. दोन्ही यंत्रणांच्या टोलवाटोलवीमुळे भूसंपादन वेळेत होणे अशक्य असल्यानेच तात्पुरत्या अधिग्रहणाची तयारी करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांची साधुग्राममध्ये व्यवस्था केली जाते. १९९१-९२ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी महापालिकेने २५ एकर क्षेत्रावर साधुग्राम विकसित केले होते. त्यानंतर गेल्या कुंभमेळ्यात म्हणजेच २००३-०४ मध्ये २०० एकर जागेवर साधुग्राम तयार करण्यात आले होते. त्याच वेळी आगामी कुंभमेळ्यासाठी तीनशे ते पाचशे एकर जागा ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली. टप्प्याटप्प्याने हा प्रस्ताव फिरत राहिला. त्यानंतर सात ते आठ वर्षांपूर्वी भूसंपादनासाठी सर्व्हे क्रमांक राज्य शासनाला कळविण्यात आले.

Web Title: Land acquisition for Sadhugram is impossible before Kumbh Mela