भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला

By Admin | Updated: September 5, 2014 00:33 IST2014-09-04T23:23:34+5:302014-09-05T00:33:52+5:30

भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला

Land Acquisition Proposal Rejected | भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला

भूसंपादनाचा प्रस्ताव फेटाळला



नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी गंगापूर येथे सुमारे चार हेक्टर जागा घेण्यासाठी महापालिका प्रशासन गेल्या तीन-चार वर्षांपासून आटापिटा करीत असताना पालिकेच्याच स्थायी समितीने मात्र त्याला ब्रेक लावला आहे. सदरच्या जागेच्या भूसंपादनापोटी १४ कोटी ३६ लाख रुपये अदा करण्याचा यापूर्वी तहकूब ठेवलेला विषय या समितीने चक्क फेटाळून लावला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते आणि त्यानुसार न्यायालयाने विहित कालावधीत भूसंपादन करण्यासही बजावले होते.
गंगापूर गावापासून सोमेश्वर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडले जाते. त्यावर पर्याय म्हणून महापालिकेने गंगापूर येथे सर्व्हे नंबर २ व ३ (पै.) ३.९७ हेक्टर मलनिस्सारण केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला. माजी आयुक्त भास्कर सानप असताना पासूनची ही भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
तथापि, जागामालक उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार गेल्या २१ आॅगस्ट रोजी त्याची फेरसुनावणी घेण्यात आली आहे.

Web Title: Land Acquisition Proposal Rejected