शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

एसटीपीची भूसंपादन प्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:41 IST

नाशिकरोड : महानगरपालिकेने पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व्हे नंबर ६३ मधील भूसंपादन प्रक्रिया रद्दबातल ठरविल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा भूसंपादन प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : पुन्हा पहिल्यापासून कामकाज करावे लागणार

नाशिकरोड : महानगरपालिकेने पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व्हे नंबर ६३ मधील भूसंपादन प्रक्रिया रद्दबातल ठरविल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा भूसंपादन प्रक्रिया राबवावी लागणार आहे.उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायाधीश इकबाल छगला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण केंद्रासाठी सन २०१४ मध्ये नाशिक महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांना भूसंपादनाचे प्रस्ताव पाठविले होते. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली; मात्र शेतकरी प्रभाकर रामदास बोराडे, हेमंत शिवाजी बोराडे, सुरेश रामचंद्र बोराडे, भिवाजी धुळाजी बोराडे, दीपक कृष्णा बोराडे, प्रकाश बोराडे, तानाजी बोराडे, सुकदेव बोराडे, बाळू बोराडे, देवराम बोराडे, गोपाळा बोराडे, मयूर पोरजे, दत्तू बोराडे व इतर यांनी भूसंपादन विरोधात अ‍ॅड. अनिल आहुजा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याचे पालन न करताच भूसंपादन केलेले आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून सन २०१४ साली केलेला भूसंपादन प्रस्ताव रद्द करण्यास पात्र आहे असे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भूसंपादन निवाडा शासनाने मागे घेतला. नवीन भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे संपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत व सर्व तरतुदींची पूर्तता करण्याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. सदर प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने पूर्वी केलेला निवाडा रद्द करण्यात आला.प्रतिज्ञापत्राप्रमाणे सन २०१५ साली तत्कालीन भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी नवीन भूसंपादन कायद्यान्वये नवीन प्रक्रिया सुरू केली; मात्र सदर प्रक्रियादेखील बेकायदेशीर असल्याने संबंधित शेतकºयांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका प्रलंबित असताना भूसंपादन अधिकारी यांनी निवाडा घोषित करून संपादित जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सदर कब्जाच्या प्रक्रियेमध्ये भूसंपादन अधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी खोटे पंचनामे करून कब्जा घेतल्याचे उच्च न्यायालयात भासविले; मात्र सदरची बाब मान्य करण्यात आली नाही.सन २०१४ साली झालेल्या निवाड्याप्रमाणे शेतकºयांना आठ कोटी रुपये भरपाई रक्कम देय होती; मात्र आता सन २०१७ साली नवीन कायद्यानुसार सदर रक्कम ही सोळा कोटी झाली. सदर निवाडादेखील सर्व्हे नं. ६३ पुरता रद्द झाल्याने आता शासनाला व महानगरपालिकेला तिसºयांदा भूसंपादनाची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागणार आहे. शेतकºयांच्या बाजूने अ‍ॅड. अनिल आहुजा यांनी बाजू मांडली.खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेनवीन भूसंपादन प्रक्रियेमध्ये कलम११ च्या अधिसूचनेनंतर कलम १९ ची अधिसूचना १२ महिन्याच्या आत प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना तशी कुठलीही कार्यवाही भूसंपादन अधिकारी यांनी केली नाही. याउलट भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी तलाठी शिंदे यांना हाताशी धरून वर नमूद अधिसूचनेच्या प्रसिद्धीबाबत खोटेनाटे कागदपत्र तयार करून खोटे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले. सदरची बाबदेखील न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. दोन्ही पक्षांना ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने संबंधित अधिकारी वासंती माळी यांच्या विरुद्ध ताशेरे ओढत शासनाने त्यांच्यावर असलेली जबाबदारी योग्य व कायदेशीररीत्या पार पाडलेली नाही व भूसंपादनाची अंतिम अधिसूचना मुदतीत न काढल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया रद्द केली.

टॅग्स :Courtन्यायालय