दिंडोरी, सिन्नरसह अन्य ठिकाणी भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:15 IST2018-05-12T00:15:48+5:302018-05-12T00:15:48+5:30
नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी दिली.

दिंडोरी, सिन्नरसह अन्य ठिकाणी भूसंपादन
सातपूर : नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी दिली. नाशिक दौऱ्यावर आलेले सेठी यांनी उद्योग भवनात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. सेठी यांनी सांगितले की, मोठी गुंतवणूक नाशिकमध्ये यावी याकरिता येथील क्षमता, कौशल्य, कामगार, पायाभूत सुविधा आणि माध्यमे यांच्याकडून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे. एमआयडीसीकडून दिंडोरी आणि सिन्नरसह काही ठिकाणी येथे औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू असून, दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्र ाळे येथे पहिल्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झालेले आहे. त्यानंतर भूखंडांचे आॅनलाइन वितरण सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, धनंजय बेळे, रमेश वैश्य, ज्ञानेश्वर गोपाळे, आयमाचे राजेंद्र अहिरे, निखिल पांचाळ, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, कैलास अहिरे, नाईसचे अध्यक्ष विक्र म सारडा, आशिष नहार आदींसह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.