शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:27 IST

नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे.

ठळक मुद्दे नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द एक जागरूक व सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडण्याची वेळएसटीला ३१ मार्चपर्यंत ‘ब्रेक’ लागला आहे

नाशिक : ‘कोरोना’चा आघात केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत आहे; मात्र या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार-१ला ६५ लाखांच्या उत्पन्नावर या आठवडाभरात पाणी सोडावे लागले आहे. एकूणच एसटी कोरोनामुक्तीच्या मार्गावर सध्या धावत आहे.‘कोरोना’मुळे गेल्या आठवडाभरात नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे एसटी प्रशानाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नाशिक आगार एकमधून धावणाºया अनेक बसेसची चाके आठवडाभरापासून थबकली आहेत. रविवारी (दि.२२) झालेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये एकही बस रस्त्यावर आली नव्हती. त्यामुळे एसटी नाशिक विभागाला एकाच दिवशी २२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी आदेश लागू केले. तसेच जिल्हाबंदी केल्यामुळे आता एसटीला ३१ मार्चपर्यंत ‘ब्रेक’ लागला आहे. लालपरी कुठल्याही गावाच्या वेशीवर पोहचणार नाही. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचा राज्याचा प्रवास बंद झाला आहे. एकूणच कारोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एसटीदेखील आपआपल्या ‘घरात’ थांबली असून, नागरिकांनीसुद्धा आता आपल्या घरातच थांबणे अवघ्या समाजाच्या हिताचे ठरणार आहे. सरकार व प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सर्व सूचनांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आपण एक जागरूक व सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस