पेठ तालुक्यात वाहनासह लाखाचे खैर लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 01:06 IST2022-03-04T01:06:30+5:302022-03-04T01:06:54+5:30
पेठ तालुक्यातील अंबास परिसरातून खैर लाकडाची चोरटी तोड करून तस्करी करणाऱ्या वाहनासह जवळपास एक लाखाचे लाकूड हस्तगत करण्यात आले.

पेठ तालुक्यात हस्तगत केलेल्या खैर लाकूड व वाहनासह वनविकास महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी.
पेठ : तालुक्यातील अंबास परिसरातून खैर लाकडाची चोरटी तोड करून तस्करी करणाऱ्या वाहनासह जवळपास एक लाखाचे लाकूड हस्तगत करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रादेशिक वन विकास महामंडळाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील आंबास गावानजीक एमएच ११ - टी ५३६९ या वाहनातून खैर प्रजातीचे लाकूड तस्करी होत असल्याने सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून वाहनासह लाखोंचे लाकूड ताब्यात घेतले.
या वाहनात खैर प्रजातीचे १५ नग १४७७ घ. मी. अंदाजे १ लाख रुपये किमतीचा वनउपज तर ३ लाख ५० हजारांचे वाहन असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रादेशिक व्यवस्थापक पी. टी. मोराणकर, विभागीय व्यवस्थापक टी. टी. ठाकूर, साहाय्यक व्यवस्थापक डी. पी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. जाधव, ए. आर. अजेस्त्र, वनपाल एस. एच. भारोटे, एच. बी. राऊत, सी. जे. चौरे, पी. पी. तायडे, एस. के. बोरसे, एम. जी. वाघ, आर. ए. गवळी, एम. व्ही. विसपुते, बी. पी. तायडे, हेमंत भोये, हेमराज गवळी आदींनी ही कारवाई केली.