शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:13 IST

मोबाइल खेचण्याबरोबरच शहरात घरफोडीचेही सत्र सुरू झाले आहे़ औरंगाबादरोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा एकाच इमारतीत दोन ठिकाणी तर सातपूरला एका ठिकाणी अशा तीन घरफोड्या करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला़

नाशिक : मोबाइल खेचण्याबरोबरच शहरात घरफोडीचेही सत्र सुरू झाले आहे़ औरंगाबादरोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा एकाच इमारतीत दोन ठिकाणी तर सातपूरला एका ठिकाणी अशा तीन घरफोड्या करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला़  इंद्रायनी लॉन्सजवळील रहिवासी सागर गावले व त्यांचे शेजारी प्रवीण कानडे हे शुक्रवारी (दि़२७) सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७४ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  घरफोडीची तिसरी घटना सातपूर परिसरातील वनविहार कॉलनीत भरदिवसा घडली़ श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी संतोष पठारे हे शुक्रवारी दुपारी कामानिमित्त कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली सहा हजाराची रोकड, एलईडी टीव्ही आणि गॅस सिलिंडर असा सुमारे २१ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई नाक्यावर मोबाइल हिसकावलामोबाइलवर बोलत जाणाऱ्या गोविंदनगर येथील धिरेंद्र राधेश्याम दुबे (रा. मोटकरी प्लाझा) यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना मुंबई नाक्यावर घडली़ या प्रकरणी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़भाडेकरूची माहिती न दिल्याने घरमालकावर गुन्हाफ्लॅट परस्पर भाडेतत्त्वावर देऊन त्याबाबतची माहिती पोलीस ठाण्यास न कळविणारे मुंबईतील भेंडी बाजार येथील हुसेन एफ. पीनवाला यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक पीनवाला यांनी टाकळी रोडवरील श्रीराम मंगल अपार्टमेंटमधील सात नंबरचा फ्लॅट गत चार वर्षांपासून एका भाडेकरूला भाडेतत्त्वावर दिला होता़तिघांनी मोबाइल चोरलामखमलाबाद रोडवरील घाटोळ मळ्यातील रहिवासी सोपान लक्ष्मण गिते यांचा सहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल संशयित वैभव संजय गांगुर्डे (रा. गणपती मंदिरासमोर, आकाश पेट्रोलपंपाजवळ, मेरीरोड, पंचवटी, नाशिक), सोन्या खंडीझोड (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही व विकी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या तिघांनी नवीन भाजीबाजार येथून चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुटवडनगरमधीलयुवकाची आत्महत्याखुटवडनगरमधील गणपती मंदिराजवळील रहिवासी गौतम जयप्रकाश सिंग (२२) या युवकाने शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी सातपूर आयटीआय आवारात उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.राका कॉलनीतून दुचाकीची चोरीपंडित कॉलनीतील जामा सदन येथील रहिवासी धनराज कानोडे यांची हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच १७, एके ६५९६) चोरट्यांनी गंगापूर रोडवरील राका कॉलनीयेथून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़युवकास मारहाणधक्का लागल्याच्या कारणातून तिघा संशयितांनी पादचारी युवकास मारहाण केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगरमध्ये शनिवारी (दि़२८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी सिद्धार्थ दादाजी उशिरे (रा. चुंचाळे घरकूल योजना, चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेलरोडला तरुणाची आत्महत्यातरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़ २८) रात्रीच्या सुमारास जेलरोड येथील पवारवाडीत घडली़ नीलेश रमेश चव्हाण (२२, रा. शक्तीनगर, पवारवाडी, जेलरोड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ त्याने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा