लाखो भाविक सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ

By Admin | Updated: April 20, 2016 00:46 IST2016-04-19T22:56:13+5:302016-04-20T00:46:37+5:30

भक्तांच्या सेवेसाठी सरसावले हजारो हात : मालपुरे परिवाराची अन्नदानाची २२ वर्षांपासून अविरत सेवा

Lakhs of devotees are headed towards Saptashringagad | लाखो भाविक सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ

लाखो भाविक सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ

कळवण : रथ काय चालना, चालना वणी ना गड ले, बोल सप्तशृंगीमाता की जय, अशा गाण्याच्या तालासुरात वाजत गाजत, नाचत लाखो देवी भक्तांचे पाय मजलदरमजल करीत कळवणमार्गे नांदुरीगडाकडे
मार्गस्थ झाले. कळवण शहरातील रस्ते देवी भक्तांनी फुलून गेल्याने मिनिटा-मिनिटाला वाहतूक ठप्प होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने रस्ता एकेरी झाला आहे. कळवणला महाप्रसाद तर भेंडी येथे उसाचा रस वाटप करण्यात येत असून, लाखो देवीभक्तांनी याचा लाभ घेतला.
रामनवमीपासून सुरू झालेल्या चैत्रोत्सवाच्या चौथ्या दिवसाअखेर लाखो भाविकांनी तर आज सोमवारी देवीभक्तांनी सकाळपासून एकच गर्दी करून लाखाहून अधिक भाविक आदिमायेच्या चरणी लीन झाले. लाखो भक्तांनी महाप्रसादाचा भोजनालयात लाभ घेतला असून, आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली.
कळवण ते नांदुरी रस्ता भाविकांनी फुलून गेला असून,
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता आदिमायेच्या दर्शनाची आस
ंघेऊन देवीभक्त सप्तशृंगगडाकडे वाटचाल करीत आहे.
गेल्या ४८ तासात लाखो भाविक मार्गस्थ झाल्याचा अंदाज असून, ठिकठिकाणी देवीभक्तांच्या सेवेसाठी दानशूर समाजधुरिणांनी अन्नदान, रस, फराळ, पाणीवाटप, आरोग्य सेवा यांसह महाप्रसादाचे आयोजन केले आहे. विठेवाडी-कळवण-नांदुरी या रस्त्यावर विविध संस्था, संघटना, मित्रमंडळांकडून देवीभक्तांना मदतीचा हात मिळत असून, माणुसकीची प्रचिती अनुभवास येत आहे.
कळवण येथील दानशूर व्यक्तिमत्त्व मधुकर मालपुरे, कमको संचालक संजय मालपुरे, माजी सरपंच अजय मालपुरे व मालपुरे परिवार २२ वर्षांपासून देवीभक्तांची अन्नदानाच्या माध्यमातून अखंड सेवा करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मालपुरे परिवाराच्या दातृत्वप्रेमापोटी देवीच्या
दर्शनासाठी कळवणमार्गे पायी जाणारे देवीभक्त मालपुरे यांच्या गुदामावरील भंडाऱ्यात हमखास हजेरी लावून पुढे मार्गस्थ होतात, हा आजवरचा इतिहास असून, चैत्रोत्सव कालावधीत मालपुरे परिवारासह त्यांचा मित्र परिवार व हितचिंतकांचे शेकडो हात देवीभक्तांच्या सेवेसाठी पुढे सरसावतात.
३५ ते ४० अंश सेल्सिअस तपमानातही देवीभक्तांचा
अलोट सागर उन्हातान्हाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर मजलदरमजल करीत अनवाणी पायी यात्रा करणाऱ्या देवीभक्तांच्या संख्येत यंदाच्या वर्षी कमालीची वाढ झाली आहे. तशी दातृत्ववानामध्ये देखील वाढ झाली असल्याचे दिसून येते.
विठेवाडी ते कळवण व कळवण ते नांदुरी या पायवाटेच्या मार्गावर अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, फळे वाटप, उसाचा रस, सरबत, आईस्क्रीम वाटपामध्ये लक्षणीय वाढ झाली असून, देवीभक्तांच्या सेवेसाठी दातृत्व मंडळींमध्ये जणू स्पर्धा लागली असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Lakhs of devotees are headed towards Saptashringagad