लखमापूर येथील मटका अड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 18:57 IST2019-07-10T18:49:41+5:302019-07-10T18:57:07+5:30
सटाणा : तालुक्यातील लखमापूर येथे मटका अड्यावर छापा टाकून सटाणा पोलिसांनी अकरा हजारांच्या रोकडसह दोघांना अटक केली आहे.

लखमापूर येथील मटका अड्यावर पोलिसांचा छापा
लखमापूर येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये मटका अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाने सोमवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी रामदास देवरे, विकास भदाणे हे कल्याण मटका खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अकरा हजार रु पयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोघा जुगारींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.