लखमापूर ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:23 IST2019-01-05T22:23:18+5:302019-01-05T22:23:36+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा समावेश असलेल्या लखमापूर ग्रामपंचायतीने कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत दारूबंदीचा ठराव केला आहे.

Lakhmapur gram panchayat panchayat resolution | लखमापूर ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव

लखमापूर ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव

ठळक मुद्दे दारूबंदीच्या अर्जाचे वाचन करण्यात

वणी : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा समावेश असलेल्या लखमापूर ग्रामपंचायतीने कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत दारूबंदीचा ठराव केला आहे.
भारतीय मानव अधिकार परिषदेच्या सूचनेनुसार तसेच ग्रामपालिकेला महिलांकडून प्राप्त झालेल्या दारूबंदीच्या अर्जाचे वाचन करण्यात आले. दारूविक्री करणाऱ्यांच्या नावांची यादी देण्यात आली. पंधरा दिवसात कारवाई करण्याबाबत सुचित करण्यात आले. सदर दारूविक्रे त्यांच्या नळजोडण्या बंद करणे, ग्रामपालिकेमार्फत कागदपत्रे न देणे याविषयी संबंधिताना नोटिसा देण्यात याव्यात व प्रशासकीय यंत्रणांना याबाबत अवगत करण्याबाबतच्या ठरावाला मान्यता देण्यात आली. ठरावाच्या सूचक ज्योती देशमुख असून, बाळासाहेब देशमुख अनुमोदक आहेत.

Web Title: Lakhmapur gram panchayat panchayat resolution