लाखलगाव पेट्रोलपंप दरोड्यातील टोळी जेरबंद

By Admin | Updated: May 6, 2017 01:34 IST2017-05-06T01:34:48+5:302017-05-06T01:34:58+5:30

पंचवटी : लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकून तेथील लाख रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे

Lakhailgaon petrol pump drift gang marched | लाखलगाव पेट्रोलपंप दरोड्यातील टोळी जेरबंद

लाखलगाव पेट्रोलपंप दरोड्यातील टोळी जेरबंद

 लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : तीन महिन्यांपूर्वी लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमाराला सशस्त्र दरोडा टाकून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत सव्वादोन लाख रुपयांची रोकड जबरीने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात गुन्हा शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या दरोड्याप्रकरणी सात संशयितांना अटक केली आहे तर त्यांचे उर्वरित साथीदार पसार झाले आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मखमलाबाद शिवारातील मोबाइल चोरी करणारा संशयित नितीन पारधी (२३) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मातोरी गावातील सोमनाथ हिरामण बर्वे, सय्यद पिंप्रीतील अनिल भाऊराव पवार, मातोरी येथील नितीन विलास पिंगळे, मखमलाबाद कोळी वाड्यातील शुभम दशरथ गायकवाड, सातपूर येथील संभाजी विलास कवळे व पेठरोड नवनाथनगर येथील देवीदास मोतीराम पवार ऊर्फ गटल्या आदी सहकाऱ्यांच्या साहाय्याने तीन महिन्यांपूर्वी लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयिताना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयित पसार झाले आहेत. या टोळीने शहरात यापूर्वी मोबाइल चोरी तसेच अन्य लुटमारीच्या घटना व वाहनचोरी केल्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. मोहिते, जाकीर शेख, शरद सोनवणे, संजय सूर्यवंशी, विशाल काठे, विशाल देवरे, शांताराम महाले, चंद्रकांत सदावर्ते, संजय मुळक, संजय पाठक, सुभाष गुंजाळ, विलास गांगुर्डे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
४नाशिक : पाथर्डी मार्गे नाशिकरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून, वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. पाथर्डी ते वडनेर गेट या भागातील पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Lakhailgaon petrol pump drift gang marched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.