शौचालयाअभावी नागरिक बसतात उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:32+5:302021-02-05T05:39:32+5:30
सातपूर येथील प्रबुद्ध नगर या दहा हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीत अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून, नागरिकांना अनेक अडचणींना ...

शौचालयाअभावी नागरिक बसतात उघड्यावर
सातपूर येथील प्रबुद्ध नगर या दहा हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीत अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या असून, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात मुख्य रस्ते दोन वर्षांपासून खोदून ठेवलेले असून, त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. संत रोहिदास महाराज चौकातील शौचालय हे जुने व जीर्ण झाले असून, त्यातील भांडे तुटलेले आहेत. त्यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना उघड्यावर शौचालयासाठी जावे लागत आहे. सदर शौचालय तोडून नवीन बांधण्यात यावे. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन चोकअप झाल्या असून, ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर वहात आहे. येथील घरांना स्लम चार्जेस आकारणी करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संरक्षक जाळ्या व दरवाजाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही, अश्या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी हातगाडी फिरवावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. सदरच्या समस्या आठ दिवसांत सोडविण्यात याव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर माजी नगरसेविका ज्योती शिंदे, बजरंग शिंदे, कैलास सोनवणे, देवीदास अहिरे, अशोक पवार, संतोष जाधव, अशोक वाव्हळे, देवराम पगारे, रमेश मोरे, रामदास पालवे, दिनेश गोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(फोटो ०३ सातपुर) - मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देताना ज्योती शिंदे, बजरंग शिंदे, कैलास सोनवणे, देवीदास अहिरे, अशोक पवार, संतोष जाधव, अशोक वाव्हळे, देवराम पगारे, रमेश मोरे, रामदास पालवे आदी.