लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोणत्याही कंपनीच्या सिमकार्डला पुरेशे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांमध्येच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर ग्रामपंचायत तसेच इतर कामे आॅनलाइन नेटवर्क अभावी रेंगाळत असून, मुखेड किंवा देशमाने येथे आॅनलाइन कामे आण िदाखले काढण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंवार येत आहे.शासकीय कामात दिवसेंदिवस ग्रामपंचायतमधील सर्वच कामे आॅनलाइन होत असून पेपरलेस आॅनलाइन प्रणालीने पारदर्शक ग्रामपंचायत हा शासनाचा मुख्य हेतू असला तरी जिथे नेटवर्कच नसेल तिथे या सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. गावात नेटवर्कच्या शोधासाठी गावातील उंच जागेचा प्रामुख्याने गावातील हनुमान मंदिर, ३८ गाव योजनेची पाण्याची टाकी अशा उंच ठिकाणावर जाऊन मोबाइलधारक नेटवर्क शोधताना दिसतात. तर ग्रामीण भागात आॅनलाइन प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने मानोरी येथे नेटवर्कसाठी मनोरा उभारण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते सुनील शेळके यांचेसह ग्रामस्थांनी केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलवर आॅनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात असून नेटवर्क अभावी मात्र मानोरी परिसरात आॅनलाईन शिक्षणाचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे. आॅनलाइन शिक्षण अभ्यासक्र म पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही उंच जागेचा आसरा घ्यावा लागत आहे.
नेटवर्क अभावी आॅनलाइन प्रणाली म्हणजे मानोरीत असून अडचण नसून खोळंबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:38 IST
मानोरी : मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोणत्याही कंपनीच्या सिमकार्डला पुरेशे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांमध्येच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर ग्रामपंचायत तसेच इतर कामे आॅनलाइन नेटवर्क अभावी रेंगाळत असून, मुखेड किंवा देशमाने येथे आॅनलाइन कामे आण िदाखले काढण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर वारंवार येत आहे.
नेटवर्क अभावी आॅनलाइन प्रणाली म्हणजे मानोरीत असून अडचण नसून खोळंबा...
ठळक मुद्देआॅनलाइन शिक्षण अभ्यासक्र म पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही उंच जागेचा आसरा घ्यावा लागत आहे.