रेमडिसिव्हर, अॅक्टेमरा इंजेक्शनचा शहरात तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:02 IST2020-09-22T23:48:01+5:302020-09-23T01:02:08+5:30
नाशिकरोड : कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व अॅक्टेमरा या इंजेक्शनचा नाशिक शहरात हेतुपुरस्करपणे कृत्रीम तुटवडा निर्माण करून काळया ...

सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांना निवेदन देतांना नगरसेवक प्रशांत दिवे, सुनील गोडसे, रोशन आढाव, राकेश जाधव, अनिकेत गांगुर्डे.
नाशिकरोड : कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व अॅक्टेमरा या इंजेक्शनचा नाशिक शहरात हेतुपुरस्करपणे कृत्रीम तुटवडा निर्माण करून काळया बाजारात विक्री केली जात आहे अन व औषध प्रशासन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी व औषधे बाजारात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या नाशिक शहरात कोविड रुग्णांचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढत आहे. परिणामी या रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसिव्हर व अॅक्टेमरा या दोन इंजेक्शनची मोठया प्रमाणात आवश्यकता भासत आहे. परंतु कोविड रुग्णांवर उपचार करणाºया रुग्णालयांकडेच या दोन्ही औषधांची कमतरता दाखविली जात आहे. परिणामी ही औषधे आणणेकामी रुग्णालये नातेवाईकांकडे मागणी करीत असतात. मात्र शहरात ही दोन्ही औषधे सहजतेने नागरीकांना उपलब्ध होत नाही. मात्र काही ठराविक ठिकाणी ही औषधे त्यांच्या किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा किंमतीला उपलब्ध होत आहे. मात्र यामुळे या नातेवाईकांना मोठया आर्थिक भूर्दंडांला सामोरे जावे लागत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक यामुळे कर्जबाजारी देखील झालेले आहे. मध्यंतरी आपल्या विभागामार्फत या औषधांचा तुटवडा नसल्याचे प्रसिध्द करुन शहरातील काही औषध एजन्सीची नावे प्रसिध्द करण्यात येवून या ठिकाणी ही औषधे मिळेल असे जाहिर करण्यात आलेले होते. मात्र अनेक नागरीकांना सदरचे ठिकाणी औषधे मिळाले नसल्याची तक्रारी आहे.
सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून रुग्णांच्या जिवाशी खेळणारी व नातेवाईकांच्या सहनशिलतेचा अंत पहाणारी अशी आहे. यामुळे कोविड रुग्ण तसेच नातेवाईक यांच्या मनात प्रशासन व शासन यांच्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत आहे. सदरचे औषधाचा पुरेसा व सुरळीत पुरवठा करुन तो कोविड रुग्णालयांपर्यंत पोचवणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्व बाबींची गंभीर दखल घेवून या औषधांचा काळा बाजार करणाºया विक्रेत्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून उपरोक्त औषधे सुलभतेने व योग्य किंमतीत उपलब्ध होणेकामी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे, सुनील गोडसे, रोशन आढाव, राकेश जाधव, अनिकेत गांगुर्डे आदींच्या स'ा आहेत.
कोरूना ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमेडेसिव्हर, अॅक्टेमरा या इंजेक्शन सोबत इतर अत्यावश्यक औषधांचा तुटवडा लवकरच दुर करून काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल. तसेच अनियमितता करणा-या मेडिकल वर सुध्दा कठोर कार्यवाही करण्यात येईल. सदरचे इंजेक्शन व इतर औषधे उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यास प्रशासन तातडीने उपलब्ध करून देईल.
- माधुरी पवार, सहाय्यक आयुक्त