स्मार्ट रोडवर पार्किंगचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:09 IST2019-05-22T00:09:05+5:302019-05-22T00:09:29+5:30
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्मार्ट रोडवर पार्किंगचा अभाव
नाशिक : महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम पूर्ण केले असून, एकतर्फी मार्ग सुरू झाला आहे. तथापि, शहराची गरज असलेल्या या मार्गावर वाहनतळाची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हा आदर्श मार्ग तयार करण्यात आला असून, रस्त्याच्या कडेला पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक तसेच अन्य सुविधा तयार देण्यात आल्या आहेत. परंतु या भागाची मूळ गरज वाहनतळाची असून, रस्त्याच्या कडेला मात्र वाहनतळाची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांनी यायचे असल्यास त्यांनी वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनतळाची सोय नसल्याने व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली आहे.