कामाप्रती निष्ठा हे  लष्कराचे ब्रीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:47 IST2018-04-21T00:47:20+5:302018-04-21T00:47:37+5:30

कामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद असून, आपण नेहमी कर्तव्याने प्रशासनिक काम केले आहे. यापुढेही दिल्लीत असलो तरी देवळालीकरांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले.

 Lack of military loyalty to Kamapati | कामाप्रती निष्ठा हे  लष्कराचे ब्रीद

कामाप्रती निष्ठा हे  लष्कराचे ब्रीद

देवळाली कॅम्प : कामाप्रती निष्ठा हे लष्कराचे ब्रीद असून, आपण नेहमी कर्तव्याने प्रशासनिक काम केले आहे. यापुढेही दिल्लीत असलो तरी देवळालीकरांच्या मदतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बोर्डाचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले.देवळाली छावणी परिषदेचे मावळते अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांची दिल्ली येथे लष्करी विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी नूतन अध्यक्ष म्हणून ब्रिगेडियर पी. रमेश (विशिष्ट सेवा मेडल) यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक सचिन ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार आदींनी कौल यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले, तर देवळाली छावणी परिषदेचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांनी देशभरात देवळाली हे आदर्श कॅन्टोन्मेंट बनविण्याचा आपला प्रयत्न असेल, असे स्वागताप्रसंगी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबूराव मोजाड, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, मीना करंजकर, आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे, भाऊसाहेब धिवरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Lack of military loyalty to Kamapati

टॅग्स :Nashikनाशिक