इएमव्ही चिपयुक्त एटीएम कार्डची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:24 IST2018-12-29T23:00:22+5:302018-12-30T00:24:50+5:30
बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विविध राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सध्याचे एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे.

इएमव्ही चिपयुक्त एटीएम कार्डची कमतरता
नाशिक : बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विविध राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सध्याचे एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे.
परंतु ग्राहकांच्या तुलनेत नवीन कार्डच्या उपलब्धतेची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून, ग्राहकांना कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शहरातील विविध बँकांकडून जुन्या एटीएम कार्डऐवजी ईएमव्ही कार्डचे वितरण सुरू आहे. परंतु अनेक ग्राहकांना पत्त्यातील, नावातील बदल अथवा तांत्रिक उणिवांमुळे हे कार्ड घरपोच मिळत नाही, असे ग्राहक मोबाइलद्वारे मिळालेला एसएमस पाहून थेट बँके त संपर्क साधत आहेत. परंतु, बँकांमध्ये रेडी किटची उपलब्धता ग्राहकांच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांना नवीन इएमव्ही कार्ड मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. दरम्यान काही बँकांनी ग्राहकांना एटीएम कार्ड घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात येत असून अद्याप ग्राहकांना कार्ड मिळालेले नाही.
कार्डाची मागणी वाढली
इएमव्ही चिपयुक्त कार्ड वितरण प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू असली तरी गेल्या दोन महिन्यांपूर्वी अचानक ३१ डिसेंबरनंतर जुने एटीएम कार्ड ब्लॉक होऊन १ जानेवारीपासून केवळ इएमव्ही कार्ड सुरू राहणार असल्याचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे ग्राहकांकडून अचानक नवीन कार्डची मागणी वाढल्याने काही प्रमाणात इएमव्ही कार्डची तूट निर्माण झाल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँके च्या अधिकाºयांनी दिली आहे.