मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:42 IST2020-08-27T23:00:01+5:302020-08-28T00:42:26+5:30
नाना पटोले : शिष्टमंडळाने घेतली भेट नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार
नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
जून २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ई-निविदेची मर्यादाही १५ लाखांपर्यंत वाढविली जाणार असल्याचे जिल्हा मजूर संस्थेचे अध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सांगितले. सहकारी संस्थाच्या ई-निविदा संबधीच्या व्यावहारीक व आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच पूर्वीप्रमाणे काम वाटप समिती मार्फत सवलतीची कामे मिळावीत यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष सकाळे, संचालक शिवाजी कासव , अभियंता बडवर या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात भेट घेतली. बैठकीत जून २०२० मध्ये झाल्या बैठकी नुसार घेतलेल्या निर्णयाची लवकरच अमंलबजावणीसाठी पुन्हा संबंधीत खात्याचे मंत्री व अधिकाऱ्याची पुढील आठवडयात बैठक होईल. या बैठकीत हा निर्णय अंतिम केला जाईल असे नाना पटोले यांनी सांगितले. मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ठेकेदारांना भेडसावणाºया विविध अडचणी व वेळोवेळी शासनाने प्रसिद्ध केलेले आदेश व त्यामधील क्लिष्टता संबधी येत्या महिण्यात सर्वसमावेश समितीचे गठण करुन प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यालयातुन मिळाली असल्याचे सकाळे यांनी सांगितले.