‘कुसुमाग्रज स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:08 IST2017-09-08T23:51:58+5:302017-09-09T00:08:18+5:30

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

'Kusumagraj will not allow funds to be monitored' | ‘कुसुमाग्रज स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही’

‘कुसुमाग्रज स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही’

निफाड : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील कविवर्य कुसुमाग्रज स्मारकाचे उदघाटन तसेच पथदीप बसविण्याच्या कामाचा व इतर विकास कामांचे उदघाटन रावल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बनकर, खा हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे नेते सुरेश पाटील, मविप्रचे सभापती माणकिराव बोरस्ते, सभापती मनीषा पवार, पंडित आहेर, मंदाकिनी बनकर, अमृता पवार, दादा जाधव, बापू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिरवाडे वणी येथे ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व नवीन कामांचा शुभारंभ यावेळी रावल यांच्या हस्ते झाला.

Web Title: 'Kusumagraj will not allow funds to be monitored'