साहित्य संमेलनामुळे कुसुमाग्रज, कानेटकर उद्यानालाही मिळणार झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:18+5:302021-02-05T05:41:18+5:30

नाशिक महापालिकेने गंगापूर गावाच्या जवळच कै. कानेटकर यांचे उद्यान साकारले असून, सुमारे सतरा एकर जागेत साकारलेल्या या उद्यानाचे काम ...

Kusumagraj, Kanetkar Udyan will also get a boost due to Sahitya Sammelan | साहित्य संमेलनामुळे कुसुमाग्रज, कानेटकर उद्यानालाही मिळणार झळाळी

साहित्य संमेलनामुळे कुसुमाग्रज, कानेटकर उद्यानालाही मिळणार झळाळी

नाशिक महापालिकेने गंगापूर गावाच्या जवळच कै. कानेटकर यांचे उद्यान साकारले असून, सुमारे सतरा एकर जागेत साकारलेल्या या उद्यानाचे काम कधीच पूर्ण क्षमतेने झाले नाही. त्यामुळे अर्धवट झालेल्या या उद्यानाला अवकळा आली आहे. त्याअगोदर म्हणजे १९९९-२००० मध्ये गोदाकाठी हनुमानवाडी येथे कुसुमाग्रज काव्य उद्यान साकारण्यात आले होते. मात्र या दोन्ही उद्यानांची अवस्था बिकट झाली आहे. या उद्यानांना साहित्यप्रेमी यांनी आवर्जून भेट द्यावी, यासाठी या उद्यानांना भेटी देऊन पहाणी करण्यात आली.

सुमारे सतरा एकर एरियामध्ये असलेल्या कानेटकर उद्यानाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरणाकरिता महासभेने मंजुरी दिली असून, जवळपास चार ते पाच कोटीचा खर्च नूतनीकरणासाठी येणार आहे. यामध्ये उद्यानास असलेली संरक्षक भिंत, एम्पिथिएटर, रंगरंगोटी तसेच उद्यानाचे नूतनीकरण इत्यादी कामाचे कार्यादेश लवकरच देण्यात येणार असून, त्याचे नूतनीकरण लवकरात लवकर २० मार्च २०२१ म्हणजेच कानेटकरांच्या जन्मशताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी करण्यात यावे, असे आदेश माननीय महापौर कुलकर्णी यांनी उद्यान विभागाला दिले आहेत.

पंचवटीतील कुसुमाग्रज उद्यान पाच हजार चौ.मी.मध्ये तयार करण्यात आलेले असून, त्यामध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे कोनशिला लावलेल्या आहेत. या उद्यानाचे नूतनीकरण करण्याच्या सूचनादेखील यावेळी देण्यात आल्या.

यावेळी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त लक्ष्मण सावजी, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील,नगरसेविका हेमलता कांडेकर, नेपथ्यकार आनंद ढाकीफळे, प्रकल्प विभागाचे राजकुमार खैरनार, पंचवटी विभागीय अधिकारी धांडे उपस्थित होते.

इन्फो...

उद्यानांचा बीओटीवर विकास

शहरातील मनपा मालकीच्या महत्त्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ म्हणजेच बीओटी तत्त्वावर देण्यात येणार असून, त्या माध्यमातून सदरच्या जागांवर मोठमोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचअंतर्गत कानेटकर उद्यान हेही अंतर्भूत असल्याचे माननीय महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

छायाचित्र आर फोटोवर ०३ कुसुमाग्रज

Web Title: Kusumagraj, Kanetkar Udyan will also get a boost due to Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.