कुसुमाग्रज हास्य क्लबचा वर्धापनदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:39 IST2018-08-30T00:39:26+5:302018-08-30T00:39:56+5:30
येथील कुसुमाग्रज हास्य क्लबचा १५वा वर्धापनदिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मंगला तांबट, अश्विनी धोपावकर, रमेश बाफणा, पुष्पा ठाकरे उपस्थित होते.

कुसुमाग्रज हास्य क्लबचा वर्धापनदिन साजरा
नाशिक : येथील कुसुमाग्रज हास्य क्लबचा १५वा वर्धापनदिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मंगला तांबट, अश्विनी धोपावकर, रमेश बाफणा, पुष्पा ठाकरे उपस्थित होते. जीवन अतिशय सुंदर आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असायला हवा. हाच दृष्टिकोन ठेवून नियमित हास्य क्लबमध्ये जावे, असे मत यावेळी हास्ययोग समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्यांनी उपस्थितांना कायम हसत राहण्याचा सल्ला दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्र मामध्ये टप्पा चेंडू, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, फॅन्सी ड्रेस यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास हास्य क्लब सदस्य उपस्थित होते.