कुसमाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:29 IST2021-02-16T20:56:12+5:302021-02-17T00:29:00+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील कुसमाडीच्या सरपंचपदी राणी बारहाते यांची तर उपसरपंचपदी हिराबाई शेजवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बारहाते यांचे माहेर व सासर कुसमाडी असून त्या येवला तालुक्यातील सर्वात तरुण महिला सरपंच असल्याचे सांगितले जात आहे.

कुसमाडी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी सरपंच पदासाठी राणी मोहन बारहाते व उपसरपंच पदासाठी हिराबाई मधुकर शेजवळ यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस. निगळ यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. या सभेस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भास्कर येवले, भाऊसाहेब पवार, सुभाष पवार, लताबाई माने, छाया येवले, मीराबाई रोटकर, नारायण जाधव यांच्यासह ग्रामसेविका योगिता मत्सागर, तलाठी बी. एम. घोडके आदी उपस्थित होते.
बिनविरोध निवडीसाठी माजी सरपंच भास्कर येवले, शिवसेना कार्यकर्ते सोपान बारहाते, खंडू ढोकणे, निवृत्ती पवार, रावसाहेब महाले, जनार्दन शेजवळ, दगु माने, दत्तू वाढवणे, अर्जुन पवार, प्रकाश शेजवळ, दत्तू जाधव, दत्तू देवरे, रामनाथ कोल्हे, बाळू येवले, नाना पवार, कैलास येवले, ज्ञानेश्वर महाले, दत्तू पवार यांनी प्रयत्न केले. यावेळी राहुल बारहाते, गोकुळ बारहाते, युवराज बारहाते, अक्षय गाढे, रोहित मोरे, अमित पवार, शशिकांत पवार, धनंजय पवार, अथर्व भांबारे, आनंद पवार, मुकुंदा पवार, मोहन पवार, सचिन पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.