पंचनाम्यासोबत नुकसानीची ध्वनीचित्रफीत कुशवाह : जिल्'ात पाच हजार हेक्टर बाधित
By Admin | Updated: February 13, 2015 01:15 IST2015-02-13T01:14:34+5:302015-02-13T01:15:11+5:30
पंचनाम्यासोबत नुकसानीची ध्वनीचित्रफीत कुशवाह : जिल्'ात पाच हजार हेक्टर बाधित

पंचनाम्यासोबत नुकसानीची ध्वनीचित्रफीत कुशवाह : जिल्'ात पाच हजार हेक्टर बाधित
नाशिक : दोन दिवसांपूर्वी जिल्'ातील सात तालुक्यांना गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेस देतानाच, ज्या ठिकाणी नुकसान झाले, त्याची ध्वनीचित्रफीतही काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी दिल्या आहेत. महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजानुसार बागलाण, येवला, कळवण, दिंडोरी, मालेगाव, सिन्नर, निफाड या सात तालुक्यांतील ९५ गावांमधील ९ हजार २८७ शेतकऱ्यांचे पिकांचे गारा व अवकाळी पावसाने नुकसान झाले. विशेष करून, गहू, कांदा, हरभरा, द्राक्ष, डाळींब, बटाटा, मसूर, वाटाणा व भाजीपाल्याचा नुकसानीत समावेश आहे. आॅक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांत प्रत्येक वेळा अवकाळी पाऊस व गारपिटीचे सत्र जिल्'ात सुरू असून, आजपावेतो सुमारे पन्नास हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यासंदर्भात शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असली तरी अद्याप शासनाने त्यावर निर्णय घेतलेला नाही, तरीदेखील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना देण्यात आलेले आहेत.