द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड
By Admin | Updated: March 8, 2016 22:40 IST2016-03-08T22:36:25+5:302016-03-08T22:40:30+5:30
द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड

द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड
आंबेगाव : येवल्यातील विहिरी कोरड्याठाकपाटोदा : यावर्षीच्या भीषण दुष्काळाचा फटका पाटोदा परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष व डाळींबबागांनाही बसला असून, द्राक्षबाग जोपासण्यासाठी येथील शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. मात्र पाण्याचा मेळ बसत नसल्याने आंबेगाव येथील शेतकरी विठ्ठल दत्तू सानप यांनी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेली सुमारे आठ एकर द्राक्षबाग मजुरांकरवी तोडून टाकली आहे.येवला तालुक्यात दुष्काळ परिस्थिती यंदा निर्माण झाली असून, अभूतपूर्व तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने माणसांनाच पिण्यास पाणी मिळत नसल्याने पोटच्या मुला-बाळांप्रमाणे जीव लावून जगविलेल्या द्राक्षबागेला कुठून पाणी द्यावे या विवंचनेत असलेल्या या शेतकऱ्याने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालविली आहे.
पाटोदा परिसरात सुमारे तीन हजार हेक्टरवर द्राक्ष व डाळींबबागा आहेत. दरवर्षी पर्जन्यमान कमी कमी होत चालल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. नगदी पीक म्हणून जोपासलेल्या या बागांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. जनावरांना तर पाणी मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. चाऱ्याचाही प्रश्न आहे.
यावर्षी पिकांना पोषक हवामान असल्याने पीकही चांगले आहे. शेकडो हेक्टरवरील द्राक्षबागांचा खुडा झाला असून, उर्वरित
बागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. त्यातच दरम्यानच्या काळात परिसरात अवकाळी पावसाने
हजेरी लावल्याने अनेक द्राक्षबागातील द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. (वार्ताहर)