पेठ येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:10 IST2021-07-02T04:10:54+5:302021-07-02T04:10:54+5:30

पेठ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप कार्यक्रम पंचायत समिती सभागृह ...

Krishi Sanjeevani week concludes at Peth | पेठ येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

पेठ येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

पेठ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप कार्यक्रम पंचायत समिती सभागृह पेठ येथे संपन्न झाला.

सभापती विलास अलबाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये गादी वाफ्यावर रोप टाकणे, बीजप्रक्रिया, दहा टक्के खतांची बचत, विकेल ते पिकेल, फळबाग लागवड याबाबत केलेल्या कार्यक्रमाचा सविस्तर तपशील सादर केला.

यावेळी पंचायत समिती सदस्य तुळशीराम वाघमारे, सुरेश पवार, महेश टोपले, पुंडलिक महाले, गट विकास अधिकारी अमित भुसावरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी डॉ. श्रीरंग वाघ यांनी प्रास्ताविक तर कृषी अधिकारी नंदकिशोर अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

------------------------------------------

पेठ पंचायत समिती सभागृहात कृषी दिनानिमित्त योजनांची माहिती देताना कृषी अधिकारी अरविंद पगारे, समवेत भास्कर गावित, विलास अलबाड, तुळशीराम वाघमारे, सुरेश पवार, महेश टोपले आदी. (०१ पेठ १)

010721\01nsk_9_01072021_13.jpg

०१ पेठ १

Web Title: Krishi Sanjeevani week concludes at Peth